

Beat the Heat: Jagdamb Pratishthan Installs Water Troughs for Animals and Birds in Junnar
Sakal
जुन्नर : उन्हाळ्याची तीव्रता गेल्या काही दिवसांपासून वाढल्याने जुन्नर शहरात पशुपक्ष्यांसाठी जगदंब प्रतिष्ठान जुन्नर यांच्या वतीने पिण्याच्या पाण्याच्या कुंड्या बसविण्यात आल्या असून या पाण्याच्या कुंड्यांमुळे पशु पक्षांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबण्यास मदत होणार आहे. जगदंब प्रतिष्ठान यांनी राबविलेल्या या अनोख्या उपक्रमाचे शहरातील नागरिक तसेच पर्यावरण प्रेमींकडून स्वागत केले जात आहे.