आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेचा पेपर वेळेवर न मिळाल्यामुळे आंदोलन

उमेदवारांमध्ये प्रचंड गोंधळ यावेळी पाहायला मिळाला
आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेचा पेपर वेळेवर न मिळाल्यामुळे आंदोलन
आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेचा पेपर वेळेवर न मिळाल्यामुळे आंदोलनsakal

पुणे : आबेदा इनामदार कॉलेजमधील आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेचा पेपर वेळेवर न मिळाल्यामुळे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आंदोलन केले. परीक्षा केंद्रावर उशिरा पेपर दाखल झाल्याने उमेदवारांमध्ये प्रचंड गोंधळ यावेळी पाहायला मिळाला. पुणे आणि नाशिक मधील केंद्रांवर हा अभूतपूर्व गोंधळ राज्य सरकारच्या अनागोंदी कारभारामुळे झाला आहे, असा आरोप मुळीक यांनी केला आहे. नाशिक मधील काही परीक्षाकेंद्रांबरोबरच पुण्यातील इनामदार कॉलेजवरील केंद्रावर प्रचंड गोंधळ दिसला. उशिरा प्रश्नपत्रिका दाखल झाल्याने उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळली. तसेच पर्यवेक्षक किंवा जबाबदार अधिकारी वेळेवर दाखल झाले नाहीत. असा आरोपही उमेदवारांनी केला आहे.

आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेचा पेपर वेळेवर न मिळाल्यामुळे आंदोलन
आर्यन खान प्रकरणातील 'त्या' गंभीर आरोपानंतर समीर वानखेडेंची प्रतिक्रिया

आंदोलनावेळी मुळीक म्हणाले,‘‘अनागोंदी कारभारामुळे परीक्षा देणाऱ्या युवकांचे कोणतेही नुकसान होऊ नये याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे. तसेच या परीक्षा घेण्याचे कंत्राट ज्या कंपन्यांना देण्यात आलेले आहे त्या कंपन्या ब्लॅक लिस्टेड असून राज्य सरकारने त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी.’’ या ब्लॅक लिस्ट कंपन्यांना परीक्षा घेण्याचे कंत्राट कोणाच्या सांगण्यावरून आणि का देण्यात आले, याचाही खुलासा ठाकरे सरकारने त्वरित करावा असेही त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com