पवारांच्या नातवाचं ठाकरे कुटुंबाच्या पावलावर पाऊल; धरली वेगळी वाट

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 October 2019

राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी मुलांना राजकारणात न येण्याचा सल्ला दिला असल्याचे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. बहुतेक हा सल्ला मनावर घेत महाराष्ट्राचे अजित पवार यांचे द्वितिय चिरंजीव जय पवार यांनी चांगलाच मनावर घेतला असल्याचे दिसत आहे. राजकारणात आलो तरी कधीही निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

पुणे - राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी मुलांना राजकारणात न येण्याचा सल्ला दिला असल्याचे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. बहुतेक हा सल्ला मनावर घेत महाराष्ट्राचे अजित पवार यांचे द्वितिय चिरंजीव जय पवार यांनी चांगलाच मनावर घेतला असल्याचे दिसत आहे. राजकारणात आलो तरी कधीही निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

बारामती विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करत असताना जय पवार हे उपस्थित होते. अजित पवार यांच्या प्रचारासाठी जय पवार यांनी सध्या आघाडी घेतली आहे. पार्थ पवार मावळ मधून निवडणूक लढवित असतानाही पडद्यामागून जय पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराची भूमिका बजावली होती. त्यानंतर पुन्हा एकदा जय पवार हे अजित पवार यांच्या प्रचारासाठी सक्रिय झाले होते. त्यानंतर राजकीय क्षेत्रात उलट सुलट चर्चांना उधाणही आले होते.

यावेळी माध्यमाशी बोलताना जय पवार यांनी स्पष्ट केले की, अनेकदा माझ्या राजकारणाच्या प्रवेशाची चर्चा सुरु असते. जरी मी राजकारणात उतरलो तरी पक्षाचं कोणतं तरी पद घेऊन सामान्य माणसांसाठी काम करेन पण मी कोणतीही निवडणूक लढविणार नाही. अशी भूमिका त्यांनी घेतल्याने आजोबा शरद पवार आणि अजित पवार यांच्यापेक्षा वेगळी वाट जय पवार यांनी धरल्याची चर्चा आहे. दरम्यान, ठाकरे कुटुंबियांकपैकी बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी कधीही कोणतीही निवडणूक लढविली नाही, यामुळे जय पवार यांनी ठाकरे कुटुंबियांच्या पावलावर पाऊल ठेवले असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jai Pawar will never contest Election