

जेजुरी, ता. ५ : नगरपरिषदेच्या मालकीच्या पुणे-पंढरपूर महामार्गालगतच्या भूखंडावर (गट क्र. ४४७) व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याचा आरोप बहुजन हक्क परिषदेचे शहराध्यक्ष यशवंत दोडके यांनी केला आहे. या जागेची तातडीने मोजणी करून अतिक्रमणे हटवण्याची मागणी त्यांनी पालिकेकडे केली आहे.
दोडके यांच्या म्हणण्यानुसार, पालिकेच्या ३८ गुंठे जागेच्या (गट क्र. ४४७) शेजारी गट क्रमांक ४४८ हा खासगी मालकीचा आहे. खासगी जागा खरेदी केलेल्या काही व्यावसायिकांनी पालिकेच्या जागेत बांधकामे केली आहेत. या जागेसंदर्भात कोट्यवधींचे व्यवहार सुरू असून, मोजणी होईपर्यंत या व्यवहारांची नोंद घेऊ नये, अशी मागणी त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयाकडे केली आहे. ही जागा जेजुरी-धालेवाडी रस्त्यालगत आहे.
‘‘जेजुरी बस स्थानकाजवळील गट क्रमांक ४४७ हा नगरपरिषदेच्या मालकीचा असून त्याची रीतसर मोजणी केली जाईल. पालिकेच्या जागेत बांधकामे झाल्याचे स्पष्ट झाल्यास, जागा विकणारे आणि खरेदी करणारे अशा दोघांवर महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम १९६६ नुसार कारवाई करण्यात येईल. तूर्त नवीन दस्ताबाबत कर आकारणीच्या फेरफार नोंदी घेतल्या जाणार नाहीत,’’ अशी माहिती मुख्याधिकारी इंगुले यांनी दिली.
बांधकामे पालिकेच्या जागेत असल्यास कारवाई करणार
- चारुदत्त इंगोले, मुख्याधिकारी, (जेजुरी नगरपरिषद)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.