

Probe Ordered Into Jal Jeevan Mission Works in Bhor, Rajgad and Mulshi
Sakal
वेल्हे (पुणे) : भोर,राजगड आणि मुळशी या तालुक्यात जलजीवन मिशनच्या मोठ्या प्रमाणात अनियमितता , अर्धवट कामे आणि कामे पूर्ण होण्याआधीच ठेकेदारांची बिले अदा करण्याचे प्रकार घडले आहेत. यासर्व पार्श्वभूमीवर आमदार शंकर मांडेकर यांनी राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेत दोषी असणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदारांची चौकशी करण्याची मागणी केली होती. याची गंभीर दखल घेत मंत्री पाटील यांनी यासर्व प्रकरणाची तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश महराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सचिवांना दिले आहेत.