जलतीर्थ मोहीम मुख्य बातमी

जलतीर्थ मोहीम मुख्य बातमी

Published on

अंक पान एक व इतर आवृत्त्यांसाठी
........

लोगो घ्‍यावा

२६२९२
कोल्हापूर ः येथील कोल्हापूर अर्थ वॉरियर्स, सकाळ माध्यम समूह, महापालिका, जिल्हा प्रशासनासह विविध संस्था व संघटनांच्या पुढाकाराने रविवारी जलतीर्थ कोल्हापूर मोहिमेला प्रारंभ झाला. यावेळी टाकाळा येथे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशीष शेलार सहभागी झाले. त्यांच्यासह स्वच्छता करताना महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, आयुक्त के. मंजुलक्ष्मी, ‘सकाळ’चे संपादक निखिल पंडितराव, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे आदी.

राज्यात जलतीर्थ स्वच्छतेचा
‘कोल्हापुरी पॅटर्न’ राबवणार

आशीष शेलार : ‘जलतीर्थ कोल्हापूर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ : ‘‘जलतीर्थ स्वच्छता मोहिमेचा कोल्हापुरी पॅटर्न राज्यभर राबवू, ’’ अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशीष शेलार यांनी केली. कोल्हापूर अर्थ वॉरियर्स, सकाळ माध्यम समूह, कोल्हापूर महापालिका, जिल्हा प्रशासनासह विविध संस्था व संघटनांच्या पुढाकाराने आज झालेल्या जलतीर्थ कोल्हापूर मोहिमेच्या वेळी टाकाळा येथे ते बोलत होते. संत गाडगेबाबा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त शहरातील पंधराहून अधिक ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात ही मोहीम झाली.
मंत्री ॲड. शेलार म्हणाले, ‘‘शासन आणि प्रशासकीय यंत्रणेबरोबरच प्रत्येक प्रश्नाच्या सोडवणुकीत लोकसहभाग महत्त्वाचा ठरतो. सामाजिक संस्थांचे योगदान मोलाचे ठरते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरू आहे; पण त्यातील लोकसहभाग अधिक वाढावा, यासाठी अशा मोहिमा वारंवार होणे गरजेचे आहे. कोल्हापुरात सुरू झालेल्या जलतीर्थ मोहिमेला येथील प्रशासकीय यंत्रणा पुढे नेईलच. त्याशिवाय राज्यभरातील पालकमंत्र्यांशी बोलून ही मोहीम राज्यभरात अधिक व्यापक करण्यासाठी सरकारचा प्रयत्न राहील.’’
महापौर रूपाराणी निकम म्हणाल्या, ‘‘मी आणि फक्त माझे’ असा विचार बळावत असताना ‘सकाळ’ लोकांना सोबत घेऊन शहरातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पुढाकार घेतो, हे कौतुकास्पदच आहे. ‘सकाळ’चे संपादक निखिल पंडितराव म्हणाले, ‘‘संत, समाज आणि शासन एकत्र आले की अनेक विधायक कामे उभी राहू शकतात, ही सकाळ माध्यम समूहाची भूमिका आहे. लोकांच्या सहभागातून यापूर्वी ‘सकाळ’ने पंचगंगा स्वच्छता मोहीम राबवली. त्याचा परिणाम म्हणून आता नदी ९० टक्क्यांहून अधिक प्रदूषणमुक्त झाली आहे.’’

‘सकाळ’चा गौरव
कोल्हापूरच्या सांस्कृतिक खुणा जपण्याचे महत्त्वपूर्ण काम सकाळ माध्यम समूह करतो आहे. एखादा माध्यम समूह शहराशी सामाजिक बांधिलकी ठेवतो तेव्हा कुठल्याही गोष्टीतील नागरिकांचा विश्वास आणखी वाढतो. कोल्हापूरचा विचार केला तर ‘सकाळ’ने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली असून, त्यातून विविध लोकचळवळी तयार झाल्याचे गौरवोद्‌गारही मंत्री ॲड. शेलार यांनी काढले.

सव्वीस टन कचऱ्याचा उठाव
‘जलतीर्थ कोल्हापूर’ मोहिमेत शहरातील विविध जलस्त्रोतांमधील तसेच परिसरातील स्वच्छतेतून तब्बल २६ टन कचऱ्याचा उठाव झाला. विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, शहरवासीयांबरोबर महापालिकेचे ४५० कर्मचारी सहभागी झाले होते. त्याशिवाय जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील बहुतांश गावांतील जलस्त्रोतांच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com