आळे येथील ज्येष्ठांना 
किराणा साहित्याचे वाटप

आळे येथील ज्येष्ठांना किराणा साहित्याचे वाटप

Published on

आळेफाटा, ता. ५ ः आळेफाटा (ता. जुन्नर) येथील जिजाऊ सखी मंच यांच्याकडून होळी आणि धुळवड सणाच्या निमित्ताने ज्याला कोणी नाही अशा ठिकाणी जाऊन होळीचा उत्सव साजरा करण्यात आला. त्यांनी आळे येथे असलेल्या अन्नपूर्णा प्रतिष्ठानमध्ये जाऊन ज्येष्ठांना मदत म्हणून गहू, तांदूळ, बाजरी, तेल डबे दिले. जिजाऊ सखी मंच हे प्रतिष्ठान गेले १० वर्ष विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत.
यावेळी अध्यक्ष वैशाली देवकर, उपाध्यक्ष वैशाली जाधव, सचिव वृषाली नरोडे, निशा शेट्टी, लता वहाळ, वर्ष गुंजाळ, मनीषा सोनवणे, पूनम हाडवले, सुपेकर ताई, पुजारी तृतीयपंथी हजर होते. सामाजिक बांधिलकी जपत महिलांचा गणपती, महिलांचे आरोग्य शिबिर, ग्रामस्वच्छता अभियान, तृतीयपंथियांसाठी विशेष उपायोजना, निराधार मुलांसाठी शालेय साहित्य वाटप त्याचप्रमाणे किराणा वाटप, महिला सक्षमीकरणांमध्ये विशेष असा सहभाग आदी विविध उपक्रम प्रतिष्ठानकडून राबविण्यात येत आहेत. त्यांच्या या उपक्रमांचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

07835

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com