बाजार आढावा सोयाबीन... जालना बाजार समिती

बाजार आढावा सोयाबीन... जालना बाजार समिती
Published on: 

जालन्यात सोयाबीन सरासरी
६९०० रुपये प्रति क्विंटल

ॲग्रोवन वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता. २८) सोयाबीनची ७८५१ क्विंटल आवक झाली. या सोयाबीनला ५०५५ ते ते ७३०१ रुपये प्रति क्विंटल, तर सरासरी ६९०० प्रति क्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.
जालना बाजार समितीमध्ये २२ ऑक्टोबरला १० हजार १ क्विंटल आवक झालेल्या सोयाबीनला ४१५० ते ७४५० रुपये प्रति क्विंटल, तर सरासरी ६८५० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. २३ ऑक्टोबरला ९८३२ क्विंटल आवक झालेल्या सोयाबीनचे दर ६००० ते ७३३२ रुपये प्रति क्विंटल राहिले. या दिवशी सोयाबीनला सरासरी ६८०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. २४ ऑक्टोबरला ११,३७५ क्विंटल आवक झालेल्या सोयाबीनचे सरासरी दर ६,९५० रुपये प्रति क्विंटल राहिले. या दिवशी सोयाबीनला किमान ६२०० तर कमाल ७३५१ प्रति क्विंटलचा दर मिळाला. २६ ऑक्टोबरला १० हजार १७७ क्विंटल आवक झालेल्या सोयाबीनचे दर ५५०० ते ७४०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहिले. या दिवशी सोयाबीनला सरासरी ७००० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. २७ ऑक्टोबरला १० हजार ४२३ क्विंटल आवक झालेल्या सोयाबीनचे दर ६,७०० ते ७,४५७ रुपये प्रति क्विंटल दरम्यान, तर सरासरी दर ७००० रुपये प्रति क्विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com