Jalseva Sankalp Abhiyan: कुकडी पाटबंधारे विभागाच्या वतीने जलसेवा संकल्प अभियान: जलसेवा संकल्प अभियानाचा आज शुभारंभ

Jalseva Sankalp Abhiyan, Kukadi Irrigation, Water Services : जलसंपदा विभागाच्या वतीने २ ते १७ ऑक्टोबरदरम्यान जलसेवा संकल्प अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
Jalseva Sankalp Abhiyan, Kukadi Irrigation, Water Services

Jalseva Sankalp Abhiyan, Kukadi Irrigation, Water Services

esakal

Updated on: 

नारायणगाव : जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांच्या वतीने ०२ ऑक्टोंबर २०२६ ते १७ ऑक्टोंबर २०२६ दरम्यान जलसेवा संकल्प अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभ

आज नारायणगाव येथील कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १येथे करण्यात आला. या निमित्त जल प्रतिज्ञा घेऊन कुकडी प्रकल्पा अंतर्गत येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे, डिंभे,चिल्हेवाडी या सहा धरणांतील पाणी व विविध नद्यांच्या पाण्याच्या जल कुंभाचे पूजन करून जलसेवा संकल्प अभियानाची सुरवात करण्यात आली.

येथील विश्रामगृहात झालेल्या कार्यक्रमात जल कुंभाचे पूजन कार्यकारी अभियंता गणेश नन्नोर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी उपकार्यकारी अभियंता रवींद्र हांडे, उपअभियंता डी.एस.कोकणे, सचिन शिंदे,तानाजी खाडे,ज्ञानेश्वर शिवगण, कुकडी प्रकल्प अंतर्गत सर्व धरण विभागाचे शाखा अभियंता, कर्मचारी उपस्थित होते.

कार्यकारी अभियंता नन्नोर म्हणाले जलसंपदा प्रकल्प, सिंचन व्यवस्था, कालवे, धरणे व जलाशय यांच्या माध्यमातून शेतकरी व नागरिकांना जलसंपदा विभागाच्या सेवा अधिक प्रभावी, पारदर्शक, लोकाभिमुख व कालबद्ध पद्धतीने उपलब्ध करून देणे हा जलसेवा संकल्प अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

या अभियाना अंतर्गत ०२ ऑक्टोंबर ते १७ ऑक्टोंबर २०२६ दरम्यान कुकडी प्रकल्पाअंतर्गत असलेल्या प्रत्येक धरणाच्या क्षेत्रीय स्तरावर संबंधित शाखा अभियंता कार्यक्रमाचे आयोजन करून शेतकरी मेळावा घेऊन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये पाणी वापर संस्था स्थापन करणे,

जलसंपदा विभागाच्या धरण, कालवे व वितरिका या सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण तसेच कालवा फुटीच्या, गळतीच्या वेळी नुकसान टाळणे, प्रकल्पाच्या उभारणीत येणाऱ्या, भूसंपादन, पुनर्वसन, वन जमिनी इत्यादी समस्या व त्या सोडविण्याबाबत चालू असलेले प्रयत्न याबाबत लाभधारकांमध्ये जागृती करतील.

तसेच शेतकरी, लाभधारक व नागरिकांना जलसंपदा विभागाच्या सेवा अधिक सुलभ, पारदर्शक व परिणामकारक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी पाणीवाटपातील पारदर्शकता, पाणीवापर संस्थांचे सक्षमीकरण, धरण व कालव्यांच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करतील..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com