

Jaltara Project: Dr. Purushottam Wayal Proposes Solution for Ane Pathar’s Water Crisis
Sakal
बेल्हे : पावसाचे पाणी उतारावरून वाहून न जाता ते जमिनीच्या पोटात जिरवणे ही काळाची गरज आहे. पठार भागातील जमिनीवर 'जलतारा' तंत्रज्ञानाचा वापर करून घेतलेले खड्डे भूजल पातळी वाढवण्यासाठी क्रांती घडवू शकतात तसेच आणे पठार भागातील पाणी टंचाईवर 'जलतारा' रामबाण उपाय ठरू शकतो असे प्रतिपादन, नुकतेच आणे (ता. जुन्नर) येथे जलतारा प्रकल्पाचे जनक डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांनी केले.