जांबुत शाखेची बॉण्ड वितरणात विक्रमी कामगिरी

जांबुत शाखेची बॉण्ड वितरणात विक्रमी कामगिरी
Published on

जांबूत शाखेची बॉण्ड
वितरणात विक्रमी कामगिरी
-----
आतापर्यंत ७ कोटी ९३ लाख रुपयांचे बॉण्ड वितरित
-----
ॲग्रोवन वृत्तसेवा
शिरूर, जि. पुणे : ग्राहकांचा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जांबूत शाखेने बॉण्ड वितरणात विक्रमी कामगिरी केली आहे. नुकतेच शाखेने विशाल जुन्नर पतपेढीला दोन कोटी रुपयांचे बॉण्ड वितरित केले.
जांबूत शाखेने आतापर्यंत विविध संस्था आणि खातेदारांना एकूण ७ कोटी ९३ लाख १० हजार रुपयांचे बॉण्ड वितरित केले आहेत. यामध्ये जांबूत ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेला पाच कोटी रुपये, विशाल जुन्नर पतपेढीला दोन कोटी रुपये, शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्थेला ५० लाख रुपये, अंबिका ग्रामीण पतसंस्थेला २५ लाख रुपये, व्यक्तिगत खातेदारांना २० लाख रुपये तर इतरांना १८ लाख १० हजार रुपयांचे बॉण्ड वितरित करण्यात आले आहेत.
शाखा प्रमुख भरत तंबारे म्हणाले, ‘‘ग्राहकांनी बँकेवर दाखविलेला विश्वास हीच आमची ताकद आहे. सुरक्षित गुंतवणुकीसोबत ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे. बॉण्ड वितरणाचा विक्रमी टप्पा हा शाखेच्या टीमच्या मेहनतीसह ग्राहकांच्या विश्वासाचे फलित आहे.’’
शाखेच्या कर्मचाऱ्यांचे परिश्रम, उत्कृष्ट टीमवर्क आणि ग्राहकांचा बँकेवरील दृढ विश्वास यामुळे ही कामगिरी शक्य झाल्याचे तंबारे यांनी सांगितले. ग्राहकांना यापुढेही विश्वासार्ह व दर्जेदार सेवा देण्यासाठी शाखा कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com