esakal | ‘जॅमर’ कारवाईचा फुटला फुगा!
sakal

बोलून बातमी शोधा

Jammer-Issue

खासगी गाड्यांवर कारवाईसाठी तेवढ्या क्षमतेचे ‘जॅमर’ उपलब्ध करण्यात येत आहेत. मात्र या काळात कारवाई सुरू राहणार असून, तोपर्यंत नोटिसा देण्यात येत आहेत. अशा प्रकारे १२ बसगाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. 
- माधव जगताप, उपायुक्त, महापालिका, पुणे

‘जॅमर’ कारवाईचा फुटला फुगा!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - रस्त्यांवर लावण्यात आलेल्या खासगी बसवर (ट्रॅव्हल्स) कारवाईस गेलेल्या महापालिकेच्या पथकाकडे ‘ट्रॅव्हल्स’च्या चाकाच्या आकाराचे ‘जॅमर’ नसल्याचे उघड झाले. त्यामुळे रस्त्यालगत बस उभ्या असूनही पथकास कारवाई करता आली नाही. त्यामुळे पालिकेचा ‘जॅमर’ लावून कारवाई करण्याचा फुगा फुटला आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, विशेष म्हणजे, वाहतूक पोलिसांकडेही या बसच्या चाकाच्या आकारांचे ‘जॅमर’ मिळाले नाहीत, त्यामुळे कारवाईला ‘ब्रेक’ लागल्याचे चित्र आहे. 

शहरातील विविध भागांतील विशेषतः राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बस स्थानके, रेल्वे स्थानक आणि हडपसर परिसरात खासगी बस उभ्या असतात. रात्रीच्या वेळी रस्त्यालगत बस थांबवून प्रवाशांची ने-आण केली जाते. त्यामुळे त्या त्या भागांत वाहतूक कोंडी होऊन स्थानिक रहिवासी, पादचारी आणि वाहनचालकांना मनस्ताप होतो. तक्रार करूनही बसवर कारवाई होत नसल्याचा नागरिकांचा अनुभव आहे. या पार्श्‍वभूमीवर अशा बसवर कारवाई करून रस्ते मोकळे करण्याची भूमिका महापालिकेने घेतली. त्यानुसार ज्या ठिकाणी बसमुळे रस्ता अडला आहे, तिथे नियमित कारवाई होणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले होते. त्यासाठी पथकेही नेमण्यात आली होती, मात्र जेव्हा ही पथके कारवाईसाठी पोचली, तेव्हा त्यांच्याकडील ‘जॅमर’ त्या बसच्या चाकांना बसू शकले नाही.

‘ट्रॅव्हल्स’च्या चाकाच्या आकाराचे ‘जॅमर’ नसल्याने कारवाई थांबली. पण बेकायदा पार्क केलेल्या बसगाड्यांच्या चालकांना नोटिसा देण्यात आल्याचे पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

loading image