काऊदऱ्यात भाविकांकडून निसर्गपूजा
जेजुरी, ता. २५ : पाटण तालुक्यातील निवकणे येथील जानाईदेवीची यात्रा सुरु आहे. यात्रेसाठी जेजुरीतून हजारो भाविक पाटण तालुक्याकडे मार्गस्थ झाले आहेत. मुख्य यात्रेपूर्वी काऊदऱ्यातील डोंगरावरून दिसणारा निसर्ग जेजुरीकरांना खुणावतो आहे. दरवर्षी येथील निसर्गाची पूजा करीत डोंगर दऱ्यातून बिया सोडल्या
जातात. काऊदऱ्यात भंडारा उधळून आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश देत जेजुरीकरांनी अनोखी निसर्ग पूजा केली.
काऊदरा परिसर समुद्रसपाटीपासून सुमारे १३०० मीटर उंच आहे. डोंगरमाथ्यावर जानाईदेवी दाखल होताच सामुदायिक निसर्गपूजेला प्रारंभ झाला. सुमारे दीडशे किलोमीटर पायी आलेल्या जेजुरीकरांसह पाटण, सातारा,
कराड परिसरातील स्थानिकांनी डोंगरमाथ्यावर भंडारा, गुलाल आणि विविध वृक्षांच्या बिया उधळत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत होते. यावेळी याज्ञसिंह पाटणकर, ओंकार भस्मे, रमेश लेंडे, नम्रता निरगुडे, अर्चना क्षीरसागर, नगरसेवक रोहित खोमणे, समीर मोरे उपस्थित होते. जानाईदेवी मोफत अन्नदान ट्रस्टच्या माध्यमातून संपूर्ण पालखी सोहळ्यात तसेच निसर्गपूजेच्या ठिकाणी पंचक्रोशीतील डोंगरवासी बांधवांना गोड भोजन देण्यात आले. डोंगरवासी महिलांना साडी-चोळी देऊन सन्मानित करण्यात आले. जेजुरी ग्रामस्थ, गुरव, पुजारी, वीर, कोळी, घडशी, खांदेकरी, मानकरी, सेवेकरी उपस्थित होते.
पारंपरिक पद्धतीने धार्मिक आणि वसुंधरेच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. पालखी सोहळा निवकणे मुक्कामी मूळ स्थानी विसावला. तिथे आज दिवसभर जानाईदेवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
पूजा, अभिषेक आदी विधी यावेळी करण्यात आले.
पालखी सोहळा पदयात्रा आयोजक राजेंद्र बारभाई, देविदास कुंभार, संजय निरगुडे, रत्नाकर मोरे, अक्षय गोडसे औदुंबर शिंदे, शेखर बारभाई, संदीप कुतवळ, बापू वीरकर, रवी सावित्रे, सुरेश सातभाई, सतीश कदम, दिलीप बारभाई, शब्बीर तांबोळी, संजय शेवाळे, सोनाली दोडके, शरद फडतरे, रमेश बयास, विजय झगडे, मोहन खोमणे आदी सहभागी होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

