

Yugendra Pawar Monitors Pump House: Full Capacity Operation from Saturday
Sakal
सुपे : बारामती, दौंड व पुरंदर तालुक्यांच्या दुष्काळी भागासाठी वरदान ठरलेल्या जनाई-शिरसाई उपसा जल सिंचन योजनांद्वारे पाण्याचे आवर्तन सुरू झाले आहे. सुमारे ३० दिवस हे आवर्तन चालणार आहे. यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल अशी माहिती युवा नेते युगेंद्र पवार यांनी सुपे (ता.बारामती) येथे पत्रकारांशी बोलताना दिली.