Video: कोरोनाच्या 1400 मृतदेहांवर अंत्यसंस्कार; जंगम कुटुंबाने पेलली अग्निसंस्कारांची धुरा

jangam-family
jangam-family

पुणे - भलेही ती व्यक्ती जिवाभावाचीही का असेना; पण कोरोनाने जीव घेतला, की तिच्या अखेरच्या दर्शनालाही कोणी फिरकत नाही ते केवळ भीतीपोटी. मात्र या भीतीला मूठमाती देत येरवड्यातील जंगम कुटुंबीयांनी मुखाग्नीची मशालच हाती घेतली आहे. निर्भेळ सेवेचा वसा घेतलेल्या या कुटुंबाने आतापर्यंत तब्बल चौदाशे मृतदेहांवर स्वतःच्या हातांनी अंत्यसंस्कार केले आहेत. 

या जिगरबाज कुटुंबीयांची भेट घेतली ती येरवड्यातील स्मशानभूमीत. ही स्मशानभूमीच त्यांची कर्मभूमी झाली आहे. साक्षात मरणाला कवेत घेऊन हे कुटुंब सेवाभाव जगत आहे. अरुण जंगम हे कुटुंबप्रमुख. पहाडी दिलाचा हा माणूस येरवड्यातील रहिवासी. पत्नी, मुलगा आणि मुलगा हे त्याचं कुटुंब. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुण्यात नऊ मार्चला कोरोनाच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर मृत्यूचं प्रमाण वाढतंच गेलं. या मृतांवर अंत्यसंस्कार कोण करणार, असा प्रश्‍न महापालिकेसमोर उभा ठाकला. कोरोनाच्या दहशतीमुळे कितीही पैसे मोजूनही हे काम करायला कोणी तयार होईना. त्याचवेळी अरुण यांनी धीरोदात्तपणे पुढे येत ही जबाबदारी स्वीकारली. घरातल्यांना अंधारात ठेवूनच त्यांनी हे काम सुरू केलं; पण हे गुपित जास्त दिवस टिकलं नाही. तीन-चार दिवसांनी पत्नी मीरा यांना सत्य काय, ते कळलं अन्‌ त्यांनी घरच डोक्‍यावर घेतलं. महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या मुलांनाही वडिलांना विरोध केला; पण "नाय-व्हय' करीत अरुण यांनी या साऱ्यांची समजूत काढली. शेवटी दोन-चार दिवसांनी पत्नीसह मुलांनीही त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या खांद्याला खांदा लावून हे तिघेही आता सकाळपासून मध्यान्ह रात्रीपर्यंत स्मशानाच्या रणागंणी झुंजताहेत.

 कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींवर येरवड्यातील अमरधाम हिंदू स्मशानभूमी व कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. मात्र, मृतदेह वाढल्यास कोरेगाव पार्क व मुंढवा येथील स्मशानभूमीचा उपयोग केला जात आहे. सध्या रोज पंचवीस ते तीस जणांवर अंत्यसंस्कार केले जातात. या कामी अरुण यांना पत्नी मीरा, मुलगी साक्षी व मुलगा अभिषेक यांची मोलाची मदत होते. अन्य सोळा तरुणही त्यांच्या मदतीला आहेत. 
मृतदेह आला की रात्र असो की दिवस त्यावर अंत्यसंस्कार केले जातात. 

बारामतीत उद्यापासून रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरु होणार..

असे होतात अंत्यसंस्कार 
1) कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याचा दूरध्वनी रुग्णालयातून येतो 
2) संबंधित रुग्णालयात शववाहिका पाठवली जाते. 
3) कोणत्या स्मशानभूमीत आणायचे, याचा निरोप चालकाला दिला जातो. 
4) शववाहिका आल्यानंतर चार ते सहा जण पीपीई कीट घालून तयार होतात 
5) शववाहिकेचे दार उघडल्यानंतर आसपास जंतुनाशकाची फवारणी केली जाते. 
6) स्ट्रेचरवर मृतदेह उतरवून, विद्युतदाहिनीच्या दिशेने नेला जातो. 
7) हा संपूर्ण मार्ग पुन्हा निर्जंतूक केला जातो. 


कोरोनामुळे पुण्यातील पहिला रुग्ण दगावला. त्यावेळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करायला कोणी तयार नव्हते. त्यानंतर मी हे काम हाती घेतले. या कामात माझ्या कुटुंबीयांचा मला फक्त पाठिंबाच नाही, तर मोलाचे सहकार्य मिळत आहे. एक पवित्र व सामाजिक काम केल्याचे समाधान यातून मिळत आहे. 
-अरुण जंगम, सामाजिक कार्यकर्ते 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com