हडपसर - आंबा म्हटले की, आपल्यासमोर पटकन येतात हापूस, पायरी, लालबाग आणि केशरसारख्या प्रमुख जाती. परंतु, जगभरात आंबा फळाच्या विविध प्रकारच्या जाती आहेत. हडपसर येथील शेतकरी व माजी नगरसेवक फारुख इनामदार आपल्या वरवंड (ता. दौंड) येथील शेतात आंतरराष्ट्रीय नव्वद, तर तीस देशी जातींसह तब्बल १२० प्रकारच्या आंबाजातीचे उत्पादन घेत आहेत. त्यामध्ये त्यांनी अत्याधिक किमतीसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘मियाझाकी जपानी आंब्या’चे उत्पादन घेण्यात यश मिळविले आहे.