कास - पोलिस पाटील हे प्रशासनाचे कान व डोळे...
जावळीतील पोलिस पाटलांना
मेढ्यात कायदेविषयक धडे
पोलिस उपअधीक्षक सुनील साळुंखेेंकडून मार्गदर्शन
कास, ता. ८ : गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस पाटील हा प्रशासनातील महत्त्वाचा घटक असून, पोलिसांचे ते कान व डोळे असल्याचे प्रतिपादन पोलिस उपअधीक्षक सुनील साळुंखे यांनी केले.
मेढा पोलिस ठाण्यात श्री. साळुंखे यांच्या उपस्थितीत जावळी तालुक्यातील पोलिस पाटील यांच्यासाठी कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मेढ्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, फाैजदार विजय शिंगटे, हावलदार सुनील वाघमळे, गोपनीयचे ओमकार दीक्षित, सनी काळे, शीतल सपकाळ आदी उपस्थित होते.
श्री. साळुंखे म्हणाले, ‘‘गावपातळीवर प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा म्हणून पोलिस पाटील काम करतात. त्यामुळे गावातील घडामोडींची अचूक माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात पोलिस पाटलांनी सक्रिय भूमिका बजावावी.’’
यावेळी २०२६ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस पाटलांचा सन्मानपत्र देऊन गौरव केला.
पोलिस निरीक्षक पाटील यांनी कामाचे कौतुक केले. पुढील काळातही जबाबदारीने व तत्परतेने काम करत राहण्यासाठी त्यांनी पोलिस पाटलांना प्रोत्साहन देत शुभेच्छा दिल्या.
जिल्हाध्यक्ष सुहास भोसले- पाटील यांनी सूत्रसंचालन केले. शुभम लोखंडे-पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रवीण पवार- पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास जावळी तालुक्यातील पोलिस पाटील उपस्थित होते.
B04683
मेढा ः पोलिस पाटील यांना मार्गदर्शन करताना सुनील साळुंखे.
...............................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

