जावळीत आता परिवर्तन अटळ, आमदार शशिकांत शिंदे
जावळीत आता परिवर्तन अटळ ः शशिकांत शिंदे
हुमगाव, ता. १ ः जावळीत आता परिवर्तन अटळ असून, सत्ताधाऱ्यांकडून होत असलेल्या दिशाभुलीला सर्वसामान्य मतदार भूलणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदेंनी केले.
म्हसवे जिल्हा परिषद गटातील उमेदवारांच्या प्रचाराच्या सभेप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदीप पवार, अशोक चव्हाण, विठ्ठलराव गोरे, शिल्पा शिंदे, डॉ. मिलिंद शिंदे, संजय शिर्के, अविनाश दुर्गावळे, ओंकार शिंदे व गटातील कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार शिंदे म्हणाले, ‘‘सत्तेच्या जोरावर लोकप्रतिनिधींकडून दबावाचे राजकारण सध्या जावळीत चालू आहे. अनेकांना निवडणुकीत न लढण्यासाठी दबाव टाकला जातोय; पण इथला मतदार सुज्ञ आहे. येत्या काळात भाजपला ते घरचा रस्ता दाखवतील. भाजपविरोधात एकवटलेली जावळीतील सर्वपक्षीय ताकदच आता त्यांना धूळ चारणार आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

