
पुणे : ‘अर्जियां’, ‘मौला मेरे मौला’, ‘कुन फाया कुन’, ‘आफरीन आफरीन’, ‘ओ रे पिया’, अशा एकापेक्षा एक बहारदार सुफी गीतांनी पुणेकर रसिकांवर शनिवारी गारूड केले. प्रतिभावंत गायक जावेद अली यांनी आपल्या जादुई आवाजाने आणि अफलातून गायकीने अविस्मरणीय मैफील रंगवली.