
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमध्ये आज एक राजकीय नाट्य पाहायला मिळाले.जयंत पाटील-अजित पवार यांच्यात बंददाराआड कॅबीनमध्ये चर्चा सुरु होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार येथे पोहोचले, तेव्हा त्यांच्यासोबत दिलीप वळसे पाटील होते. वळसे पाटील यांनी थेट अजित पवार बसलेल्या केबिनचे दार उघडले आणि पवार साहेब आल्याची माहिती दिली.