Eknath Shinde : शिंदेंचा जयंत पाटलांना चिमटा; म्हणाले, अधिवेशनाच्या शेवटच्या... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde and Jayant Patil

Eknath Shinde : शिंदेंचा जयंत पाटलांना चिमटा; म्हणाले, अधिवेशनाच्या शेवटच्या...

पुणे - पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, विरोधीपक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना जयंत पाटलांना चिमटा काढला.

हेही वाचा: Dhananjay Munde : पंकजा मुंडेंपाठोपाठ उपमुख्यमंत्रीही धनंजय मुंडे यांच्या भेटीला

एकनाथ शिंदे म्हणाले की, शरद पवार यांच्या तोंडी नेहमीच साखर असते. त्यानंतर स्मित हास्य देत जयंतरावांच्याही तोंडी साखर असते, असं शिंदे म्हणाले. अधिवेशनात जयंतरावांची अजितदादांनी आठवण केली होते. जयंतराव नाही, तर मजा नाही, असं अजितदादा म्हणाले होते, असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.

नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द उच्चारला होता. यावरून सत्ताधारी आक्रमक झाले होते. सत्ताधाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनीच जयंत पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर जयंत पाटील यांना अधिवेशन काळासाठी निलंबित केलं होतं. त्यामुळे अखेरच्या दिवशी जयंत पाटील अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सभागृहात नव्हते.

हेही वाचा: Ramdas Athawale : "संजय राऊतांनी आणखी २०-२५ वर्षे विरोधी पक्षात राहावं"

दरम्यान अधिवेशनातील आठवण काढून शिंदे यांनी एकप्रकारे जयंत पाटील यांना एकप्रकारे चिमटाच काढला. यावेळी शिंदे यांनी वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटच्या कार्याचा गौरव केला.

यावेळी शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. पवार यांनी देशात अनेक जबाबदारी पार पाडल्या. त्यांचं मार्गदर्शन मिळतं. सत्तेवर कोण आहे, हे न पाहता, पवार साहेब मार्गदर्शन करतात. मला देखील जेव्हा गरज असेल तेव्हा फोन करून सूचना करतात. त्यासाठी मी आभारी आहे, असंही शिंदे म्हणाले.