सिंहगड रस्ता - 'जयंत पाटील यांचा राजीनामा तुमच्या वाहिन्यांवरच दिसला आहे. मी तरी जयंत पाटील यांचा कुठलाही राजीनामा पाहिला नाही, वाचला नाही. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याबद्दल फक्त माध्यमातच चर्चा सुरू आहे.' अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी पाटील यांच्या राजीनाम्याबद्दलच्या चर्चेला पूर्णविराम दिला.