
पुणे : ‘जयंत पाटील वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी सात वर्षे प्रदेशाध्यक्षपद भूषविले आहे. ते नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा विचार करत असतील. त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवर काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला असू शकतो,’ अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.