जेईई ऍडव्हान्सच्या निकालाची तारीख निश्चित; उद्या मिळणार 'आन्सर की'

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

आयआयटी दिल्लीतर्फे घेण्यात आलेल्या "जेईई ऍडव्हान्स' परीक्षेचा निकाल 5 ऑक्टो बर रोजी जाहीर केला जाणार आहे. तर उद्या (मंगळवारी) उत्तरांसाठी उत्तरतालिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना निकालाचा अंदाज येण्याची शक्य्ता आहे.

पुणे - आयआयटी दिल्लीतर्फे घेण्यात आलेल्या "जेईई ऍडव्हान्स' परीक्षेचा निकाल 5 ऑक्टो बर रोजी जाहीर केला जाणार आहे. तर उद्या (मंगळवारी) उत्तरांसाठी उत्तरतालिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना निकालाचा अंदाज येण्याची शक्य्ता आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रविवारी देशभरात "जेईई-ऍडव्हान्स' परीक्षा झाली. विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी (ता. 29) सकाळी दहा वाजता उत्तरतालिका जाहीर करण्यात येणार आहेत. पुण्यातील एलन करिअर संस्थेचे केंद्र प्रमुख अरुण जैन म्हणाले, 'विद्यार्थ्यांनी जेईई एडव्हांन्सच्या संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक, जन्म तारीख, मोबाईल क्रमांक ही माहिती भरून लॉग ईन करावे. तेथे त्यांना त्यांनी सोडविलेली उत्तरपत्रिका उपलब्ध असेल. शिवाय मूळ उत्तरतालिकाही उपलब्ध असल्याने दोन्हीची तुलना करून कोणते उत्तर बरोबर आहे व कोणते चुकले आहे हे विद्यार्थ्यांना समजेल.' विद्यार्थ्यांना उत्तराबाबत पुनरावलोकन करायचे असल्यास किंवा त्याबाबत अभिप्राय द्यायचा असल्यास अर्ज करण्यासाठी 30 सप्टेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंतच मुदत आहे. जेईई- ऍडव्हान्सचा निकाल 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता जाहीर होणार आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jee advanced 2020 result date 5 october answer key on 29 september