
पुणे : देशातील एनआयटी, आयआयआयटी यांसह केंद्रीय अर्थसहाय्यित तांत्रिक संस्थांमध्ये अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय पातळीवर घेतलेल्या जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परीक्षेत २४ विद्यार्थ्यांनी १०० एनटीए स्कोअर मिळविले असून यात महाराष्ट्रातील आयुष चौधरी, सानिध्य सराफ आणि विशद जैन यांनी १०० एनटीए स्कोअर मिळवीत महाराष्ट्राच्या क्रमवारी अव्वल स्थान पटकाविले आहे.