

JEE Main 2026
sakal
पुणे : देश पातळीवरील नामांकित संस्थांमध्ये अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी ‘जेईई मेन’ परीक्षा सध्या सुरू आहे. पहिल्या सत्रातील जेईई मेन परीक्षा २१ ते २४ जानेवारी दरम्यान होत आहे. दरम्यान, पुण्यात ‘पुणे ग्रॅंड टूर’ ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा होत असून यानिमित्त शहराच्या विविध भागातील वाहतुकीत बदल केल्याने अनेक रस्ते बंद राहणार आहेत. परिणामी, ‘जेईई मेन’परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.