

पुणे - शहरातील महागड्या खासगी प्रशिक्षण संस्थांऐवजी आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच जेईई आणि नीट या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांची तयारी करता येणार आहे. शिरूर तालुक्यातील वसेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत या परीक्षांच्या अभ्यासक्रमाचे मोफत शिक्षण सुरू करण्यात आले आहे. जिल्हा परिषद पुणे आणि ‘गिव्हवाइज इंडिया फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.