जेजुरीत लोणारी ट्रस्टची जागा वाचवण्यासाठी मोर्चा

जेजुरीत लोणारी ट्रस्टची जागा वाचवण्यासाठी मोर्चा
Published on

जेजुरी, ता. २५ : येथील राधाबाई बाबाजी नरळे लोणारी ट्रस्टची २३ एकर जागा वाचवण्यासाठी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली लोणारी समाजाचा मोर्चा काढण्यात आला. यावेळी दोन्ही ट्रस्टचे विश्‍वस्त मंडळ तत्काळ बरखास्त करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
जेजुरीतील ट्रस्टची सुमारे १०० कोटी रुपये किमतीची २३ एकर जागा केवळ ९ कोटी रुपयांत विकण्याचा घाट विश्‍वस्तांनी घातल्याचा आरोप करत याविरोधात समाजाने एल्गार पुकारला आहे. नरळे ट्रस्टच्या जागेपासून ते लोणारी धर्मशाळेपर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात राज्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी धंगेकर म्हणाले, ‘‘जेजुरीतील ही मालमत्ता समाजाची असून विश्‍वस्तांचा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही. येत्या दोन वर्षांत येथे धर्मशाळा उभारली जाईल.’’ धंगेकर यांनी या कार्यासाठी २१ लाख रुपयांची मदतही जाहीर केली.
उद्योजक डॉ. रामदास कुटे यांनी विश्‍वस्तांच्या नाकर्तेपणामुळे धर्मशाळेची दुरवस्था झाल्याची टीका केली. समाजाची जागा विकण्याचा प्रयत्न हाणून पाडला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. या सभेत माजी अध्यक्ष सुभाष नरळे, नवनाथ रानगट, गोरख शिंदे, तानाजी करचे, शिवाजीराव शिंदे, डॉ. सुदर्शन घेडगे, नर्मदा खाडे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. रामदास कुटे, उमाजी नाना ढेंबरे, संदीप होळकर, सोमनाथ कणसे यांनी केले. श्रीकांत राणे यांनी सूत्रसंचालन तर अप्पासाहेब करचे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com