Jejuri Somvati Yatra: जेजुरीत रंगला सोमवतीचा सोहळा ;भाविकांची गर्दी; गडावर भंडाऱ्याची उधळण अन् आतषबाजी

Khandoba Temple Festival : जेजुरीत खंडोबाची सोमवती यात्रा भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडली. कऱ्हा नदीवर सकाळी अकरा वाजता उत्सवमूर्तींना स्नान घालण्यात आले. भंडाऱ्याची उधळण, आतषबाजी आणि खंडोबाच्या जयघोषात भाविकांनी सोमवती स्नानाची पर्वणी साधली.
Devotees gather at Karha River in Jejuri for the traditional Somvati Yatra of Lord Khandoba.

Devotees gather at Karha River in Jejuri for the traditional Somvati Yatra of Lord Khandoba.

esakal

Updated on: 

जेजुरी,: श्री. क्षेत्र जेजुरीत सोमवारी (ता. ९) खंडोबाची सोमवती यात्रा भरली होती. सकाळी अकरा वाजता कऱ्हा स्नान झाले. यावेळी सोमवती स्नानाची पर्वणी भाविकांनी साधली. खंडोबाचा जयघोष, भंडाऱ्याची उधळण व आतषबाजी यामुळे यंदा सोमवती सोहळा जल्लोषात पार पडला.

दिवाळीत सोमवती यात्रा आल्याने सनई चौघड्याबरोबर आतषबाजी पाहण्यास मिळाली. खांदेकरी, मानकरी, पालखी धालेवाडी जवळील कऱ्हा नदी घाटावर घेऊन जातात. आज सकाळी पहाटे पाच वाजता पेशव्यांनी इशारा देताच पालखी सोहळा सुरू झाला.

Loading content, please wait...