
जेजुरी - तिर्थक्षेत्र जेजुरीसाठी (ता. पुरंदर) वीर जलाशयावरून नवीन पाणी योजना मंजूर झाली. तिची निविदाही मंजूर झाली. मात्र, गेले १० महिन्यांपासून या योजनेला मुहूर्तच सापडेना. यामुळे जेजुरीत तीन ते चार दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. याबाबत तातडीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.