‘जेट एअरवेज’ची पुणे ते सिंगापूर नॉनस्टॉप सेवा सुरू

दिलीप कु-हाडे 
शनिवार, 1 डिसेंबर 2018

लोहगाव विमानतळ झालेल्या पत्रकार परिषेदेत दुबे बोलत होते. यावेळी खासदार अनिल शिरोळे, राज्यसभा खासदार संभाजी राजे छत्रपती, नागरी विमान वाहतूक सचिव बलसा नायर सिंग, विमानतळ संचालक अजय कुमार, सिंगापूर पर्यटन मंडळाचे प्रादेशिक संचालक जी.बी. श्रीथर, अजय श्रीवास्तीव उपस्थित होते. 

येरवडा : गेल्यावर्षी तब्बल ३६ हजारापेक्षा अधिक पुणेकर सिंगापूरला गेले होते. हा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे जेट एअरवेजची १ डिसेंबर पासून पुणे ते सिंगापूर दरम्यान विनाथांबा सेवा सुरू होत आहे. याचा फायदा पर्यटक, उद्योजकांना होणार असून पुण्यातील ताजी फळे, भाजीपाला सिंगापूरला निर्यात होणार असल्याची माहिती जेट एअरवेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांनी दिली.

लोहगाव विमानतळ झालेल्या पत्रकार परिषेदेत दुबे बोलत होते. यावेळी खासदार अनिल शिरोळे, राज्यसभा खासदार संभाजी राजे छत्रपती, नागरी विमान वाहतूक सचिव बलसा नायर सिंग, विमानतळ संचालक अजय कुमार, सिंगापूर पर्यटन मंडळाचे प्रादेशिक संचालक जी.बी. श्रीथर, अजय श्रीवास्तीव उपस्थित होते. 

दुबे म्हणाले, ‘‘ पुणे व सिंगापूर या दरम्यान थेट विमानसेवा सुरू करणारी जेट एअरवेज ही पहिली भारतीय कंपनी आहे. प्रवाशांना पुण्यातून थेट जेट एअरवेजच्या कोरशेअर व इंटरलाईन पार्टनर्सव्दारे आशिया-पॅसिफिक प्रदेश व ऑस्ट्रिलिया येथील २१ ठिकाणी जाता येणार आहे. जेट एअरवेज सिंगापूरमार्गे ऑकलंड, बँकॉक, ब्रिस्बेन, बाली, हानोई, जकार्ता, कौलालम्पूर, मनिला, मेलबर्न, शांघाय आदी ठिकाणी वन स्टॉप कनेक्टिविटी देणार आहे.’’

जेट एअरवेजने पुण्यापासून ‘इंट्रोडक्टरी’ रिटर्न इकॉनॉमी भाडे २१,५०० रूपयांपासून तर प्रीमिअर भाडे ६५५०० रूपयांपासून असणार आहे. पुण्यातील ग्राहक व निर्यातकांना सिंगापूरला व जवळच्या मलेशियाला फळे, पालेभाजाच्यासह कार्गो गुड्स सुरळीतपणे पाठवता येणार आहे. त्यामुळे निर्यातकांचा वेळ व पैसे वाचणार असल्याचेही दुबे यांनी सांगितले. 

पुण्याच्या नवीन विमानतळाच्या मुख्य सहा परवानग्यांना मान्यता मिळाली आहे. यामध्ये मुख्यत: संरक्षण ना हरकत प्रमाणपत्राचा समावेश आहे. यामध्ये जमिन अधिग्रहण बाकी असल्याची माहिती बलसा नायर यांनी दिली.

जेट एअरवेजमध्ये मिळणार वडापाव व पुरणपोळी
जेट एअरवेजमध्ये महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ विशेषत: वडापाव व पुरणपोळी मिळावे, अशी मागणी राज्याच्या नागरी विमान वाहतूक सचिव बलसा नायर सिंग यांनी केली. यावर दुबे यांनी पत्नी पुणेकर असून आमटी भात आवडीने खातो, असे सांगत तत्काळ मान्यता दिली.

Web Title: Jet Airways starts Pune to Singapore flight