पुर्ण दाबाने व अखंडीत वीजपुरवठा व्हावा : आमदार नारायण पाटील जेऊर येथे महावितरण अधिकारी यांची घेतली आढावा बैठक
KOR26B10628
जेऊर (ता. करमाळा) : येथे महावितरण व शेतकऱ्यांच्या आढावा बैठकीत बोलताना आमदार नारायण पाटील.
---
शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नांकडे कुटुंबीयांप्रमाणे पाहा
महावितरणच्या जेऊर येथील आढावा बैठकीत आमदार पाटलांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
करमाळा, ता. २१ : विजेच्या समस्या व मागण्या घेऊन येणारा प्रत्येक शेतकरी हा आपल्या कुटुंबातीलच आहे, अशी भावना ठेवून अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे वीजप्रश्न सोडवावेत, असे निर्देश आमदार नारायण पाटील यांनी दिले. उन्हाळी हंगामात वाढणारी वीज मागणी लक्षात घेता पूर्ण दाबाने व अखंडित वीजपुरवठा व्हावा, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना केल्या.
जेऊर (ता. करमाळा) येथे आमदार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणची आढावा बैठक पार पडली. यावेळी उपविभागीय कार्यकारी अभियंता वीरेंद्र कलावते, उपअभियंता प्रभास भोयर (जेऊर विभाग), उपअभियंता पोपट चव्हाण (कुर्डुवाडी विभाग) यांच्यासह सर्व शाखा अभियंते उपस्थित होते.
बैठकीत अनेक शेतकऱ्यांनी आपापल्या समस्या मांडल्या. यापूर्वी २८ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीतील विषयांचाही आढावा घेण्यात आला. शेतकरी, ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.
यावेळी आमदार पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित रानात उभ्या पिकांवर अवलंबून असते. या एका पिकावर कुटुंबाचा संपूर्ण प्रपंच चालतो. त्यामुळे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेत त्यांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात. उन्हाळा तोंडावर असताना वीज मागणी वाढणार असल्याने योग्य नियोजन करून अखंडित वीजपुरवठा करावा. यापुढे जिल्हा परिषद गटनिहाय महावितरण आढावा बैठका घेण्यात येणार असून, शाखा अभियंते व कर्मचाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा करू नये, असे स्पष्ट आदेश त्यांनी दिले.
यावेळी ‘आदिनाथ’चे उपाध्यक्ष महेंद्र पाटील, माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, विजय नवले, ज्ञानेश्वर गोडसे, धनंजय शिरस्कर, माजी सभापती अतुल पाटील, डॉ. हरिदास केवरे, प्रा. संजय चौधरी आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक सुनील तळेकर यांनी केले. आभार चंद्रप्रकाश दराडे यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

