jewellery purchase
sakal
पुणे - दसरा हा शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जात असून या दिवशी सोने खरेदीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या वर्षीही हा सण खरेदीच्या उत्साहात मोठी भर घालणार आहे. मात्र गेल्या काही दिवसांत सोने व चांदीच्या भावात झालेल्या वाढीमुळे गुंतवणूकदारांचा ओढा नाणे आणि बारकडे वाढलेला दिसत आहे. या व्यतिरिक्त हिऱ्यांच्या दागिन्यांनाही मोठी मागणी असून, दसऱ्याच्या तोंडावर दागिन्यांच्या विक्रीत समाधानकारक वाढ दिसून येत आहे.