

Jigyasa Resource Centre disburses Rs 9.99 crore loans to 120 self help groups in Ambegaon and Khed with 100 percent recovery
Sakal
मंचर : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), पुणे अंतर्गत कार्यरत जिज्ञासा लोकसंचलित साधन केंद्र, मंचर यांनी गेल्या तेरा वर्षांत आंबेगाव व खेड तालुक्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. महिला बचत गटांची स्थापना, त्यांना उद्योग-व्यवसायासाठी प्रशिक्षण, विविध बँकांच्या माध्यमातून अर्थसाहाय्य आणि स्वावलंबनाचा मार्ग उपलब्ध करून देण्यात जिज्ञासा केंद्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात १२० बचत गटांतील ७५० महिलांना एकूण ₹९ कोटी ९९ लाख ५० हजारांचे कर्ज वाटप करण्यात आले असून या कर्जाची शंभर टक्के वसुली झाली आहे, अशी माहिती जिज्ञासा लोकसंचलित साधन केंद्राच्या व्यवस्थापक मनीषा जारकड यांनी दिली.