esakal | तरुणांनो, 'या' १० क्षेत्रांत लाॅकडाऊनमध्येही मिळतेय नोकरीची संधी!
sakal

बोलून बातमी शोधा

Job opportunities even in lockdown

- कुशल मनुष्यबळास मागणी
- 'लिंक्डइन' व्यावसायिक नेटवर्किंग साईटवर माहिती

तरुणांनो, 'या' १० क्षेत्रांत लाॅकडाऊनमध्येही मिळतेय नोकरीची संधी!

sakal_logo
By
ब्रिजमोहन पाटील

पुणे : 'लाॅकडाऊन'मुळे एकीकडे नोकऱ्या जात असताना दुसरीकडे कंपन्यांमध्ये कौशल्य असलेल्यांना मोठी मागणी आहे. डिजिटल मार्केटिंग, आयटी हेल्प डेस्क, ग्राफिक्स डिझाईन यासारख्या १० क्षेत्रांत मोठी संधी तरुणांना असल्याचे 'लिंक्डइन' या व्यावसायिक नेटवर्किंग साईटने स्पष्ट केले आहे. योग्य माध्यमातून कंपनीत अर्ज केल्यास नोकरी मिळणे शक्य आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

उद्योग क्षेत्रात असलेल्या मंदीमुळे रोजगार निर्मिती कमी झाली होती. त्यामुळे बेरोजगारीचे संकट निर्माण झाले, त्यातच मार्च महिन्यापासून 'कोरोना'चे रुग्ण वाढायला लागल्यानंतर लाॅकडाऊन जाहीर झाले. कंपन्यांमधील उत्पादन बंद करण्याची नामुष्की आली. तर, आयटीसह अनेक क्षेत्रात 'वर्क फ्राॅम होम' सुरू झाले. लाॅकडाऊनचा कालावधी वाढत जात असताना अनेकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले, तर पगार कपातही मोठ्या प्रमाणात झाली, त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. 

एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे कंपन्यांमध्ये ऑनलाईन काम करणाऱ्या आयटी, सर्व्हिस सेक्टर, फार्मा यासह सर्वच क्षेत्रात मोठी संधी निर्माण होत आहे. 'लिंक्डइन' या व्यावसायिक नेटवर्किंग साईटवर नोंदविल्या गेलेल्या मागणीनुसार सर्वाधिक रोजगार कोणत्या क्षेत्रात आहे हे ओळखले आहेत. उमेदवारांना नोकरी मिळावी यासाठी कौशल्य वाढविण्यात मदत करण्यासाठी कंपन्या विनामूल्य ऑनलाइन प्रशिक्षण देत आहेत. तसेच 'लिंक्डझन'कडूनही मदत केली जात आहे. स्क्रील असलेल्या उमेदवारांसाठी पुढील चार वर्ष मोठी संधी असल्याचे वृत्त 'मनीकंट्रोल' या संकेतस्थळाने दिले आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ट्विटर वरून @iamShantanu_D या हँडलवरून नोकरीच्या नविन संधी कुठे आहे. याचे रोहित दलाल म्हणाले, "लाॅकडाऊन मध्ये मंदी असली तरी ज्यांच्याकडे स्क्रील आहे अशांत मोठी मागणी आहे. अनेक नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी निर्माण होत आहेत. 'लिंक्डइन'ने त्यावरून सर्वाधिक मागणी असलेल्या नोकर्यांची यादी जाहीर केली आहे. तसेच लाॅकडाऊन काळात गुगल, फेसबुक, हावर्ड युनिव्हर्सिटीने स्क्रील डेव्हलपमेंटसाठी अनेक मोफत आॅनलाईन कोर्सही सुरू केले आहेत. त्यातून अनेकांना नोकरीची संधी उपलब्ध होत आहे.


सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यातील २३.४८% वरून जूनमध्ये भारताचा बेरोजगारीचा दर १०.९९% पर्यंत खाली आला आहे. 


योग्य संधी ओळखताना अशी घ्यावी काळजी

-  'लिंक्डइन' या साईटवर कंपन्यांचे थेट मालक, एचआर रोजगाराची माहिती देतात,  ती अधिकृत माहिती असते. 
- नोकरी विषय संकेतस्थळावर जाऊन तेथे 'इझी अप्लाय' या आॅपशनवरून चाचपणी करावी
- त्यामुळे फेक माहितीतून फसवणूक टळते
- संबंधित कंपनीच्या थेट करिअर पोर्टलवरून नोकरीसाठी अर्ज करावा
- आॅनलाईन माहिती घेताना ज्या कंपनीत ओपनिंग आहे, त्याऐवजी दुसरीच लिंक ओपन होत असेल तर त्यापासून सावध रहावे. 

 'लिंक्डइन'वर नोंदविल्या गेलेल्या टॉप १० नोकऱ्या

- ​डिजीटल मार्केटर
-आयटी सपोर्ट/हेल्प डेस्क
-ग्राफिक्स डिझायनर
-फायनान्शिअल अॅनालिस्ट
-डाटा अॅनालिस्ट
-साॅफ्टवेअर डेव्हलपर
-प्रोजेक्ट मॅनेजर
-सेल्स रिप्रझेंटेटीव्ह 
-आयटी अॅडमिनीस्ट्रेटर
-कस्टमर सर्व्हिस स्पेशालिस्ट 

loading image
go to top