तलाठी नोकरी फसवणूक

तलाठी नोकरी फसवणूक
Published on

नोकरीच्या बहाण्याने २१ लाखांनी गंडविले

तलाठी पदाची बनावट नियुक्तीपत्र; अवधूतवाडीत पाच जणांवर गुन्हा

ॲग्रोवन वृत्तसेवा
यवतमाळ : तलाठी पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तरुणांकडून २१ लाख १० हजार रुपये उकळल्याचा प्रकार यवतमाळात उघडकीस आला. पैसे घेतल्यानंतर आरोपींनी तलाठी पदाचे बनावट नियुक्तीपत्र दिल्याचे समोर आले. याप्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, स्थानिक गुन्हे शाखेने एका संशयिताला संभाजीनगर येथून अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आर्णी तालुक्यातील चिंचवडी येथील वैभव कृष्ण राठोड (३०) हा यवतमाळात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. २०२३ मध्ये महसूल विभागाच्या तलाठी पदासाठी झालेली परीक्षा त्याने दिली होती. मात्र, त्याची निवड झाली नव्हती. त्यानंतर गावातील एका व्यक्तीसोबत असताना त्याची तुळशीराम जाधव (४८, रा. दीप नगर, यवतमाळ) याच्याशी भेट झाली. जाधव याने तलाठी भरतीसाठी पैसे देण्याची तयारी असल्यास नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार ७ मे २०२६ रोजी गोधणी रोडवरील एका हॉटेलजवळ भेट झाली. जाधव आणि इतर आरोपींच्या माध्यमातून नोकरी लावून देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यावर विश्‍वास ठेवून वैभव राठोड व त्याच्या कुटुंबीयांनी आरोपींना २१ लाख १० हजार रुपये दिले. त्यानंतर आरोपींनी तलाठी पदाचे बनावट नियुक्तीपत्र दिले. हे नियुक्तीपत्र बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर राठोड यांनी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीवरून पोलिसांनी बाळासाहेब हरबक (५५), रमेश हाके (३०), सोळंकी (५०), लोंढे (सर्व रा. संभाजीनगर) आणि तुळशीराम जाधव (४८, रा. दीप नगर, यवतमाळ) यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. स्थानिक गुन्हे शाखेने यातील एका संशयिताला संभाजीनगर येथून ताब्यात घेतल्याची माहिती आहे. पुढील तपास ठाणेदार अजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com