
पुणे : सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्याच्या बहाण्याने सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले असल्याचे चौकशीत समोर आले आहे. मात्र या महिलेवर अजूनही कारवाई झालेली नाही. प्रशासनाकडून केवळ कागदीघोडे नाचविले जात आहेत.