Hinjewadi TrafficSakal
पुणे
Hinjewadi Traffic : हिंजवडीसाठी अखेर हालचाली; आयटी कर्मचारी, रहिवाशांसह प्रशासकीय विभागांची बैठक
Pune Updates : हिंजवडी वाहतूक समस्येवर उपाय शोधण्यासाठी आयटी कर्मचारी, रहिवासी व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून पुढील आठवड्यात क्षेत्र पाहणी केली जाणार आहे.
पिंपरी : हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आयटी कर्मचारी, रहिवासी आणि पीएमआरडीए, एमआयडीसी व वाहतूक विभाग यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी (ता.७) पार पडली. यावेळी हिंजवडीतील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासोबतच अतिक्रमण हटविणे, राडारोडा काढणे, गतिरोधक अशा विषयांवर चर्चा झाली.