esakal | वाघोलीच्या विविध प्रश्नासंदर्भात लवकरच संयुक्त बैठक : अशोक पवार
sakal

बोलून बातमी शोधा

अशोक पवार

वाघोलीच्या विविध प्रश्नासंदर्भात लवकरच संयुक्त बैठक : अशोक पवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाघोली : वाघोलीच्या विविध प्रश्नासंदर्भात महापालिका आयुक्त, पी एम आर डी ए आयुक्त व अन्य अधिकाऱ्यांची लवकरच सयूंक्त बैठक घेण्यात येईल. अशी माहिती आमदार अशोक पवार यांनी दिली.

हवेली तहसील कार्यालय, पंचायत समिती हवेली यांच्या सयूंक्त विद्यमाने वाघोलीत रक्तदान शिबिराचे उदघाटन पवार यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी हवेलीचे उपविभागीय अधिकारी संजय आसवले, तहसीलदार तृप्ती कोलते पाटील, अपर तहसीलदार विजयकुमार चोबे, माजी सरपंच वसुंधर उबाळे, रामदास दाभाडे, शिवदास उबाळे, बाळासाहेब सातव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, सहायक पोलीस निरीक्षक शिवशात खोसे आदी उपस्तीत होते.

हेही वाचा: ओबीसी आरक्षणाच्या सुधारित अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी

पवार पुढे म्हणाले, वाघोलीच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. काही प्रश्न पी एम आर डी ए च्या कक्षेत तर बाकी महापालिकेच्या कक्षेत आहेत. ते लवकर सुटावेत यासाठी ही सयूंक्त बैठक घेणार आहे. उदघाटनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी स्वतः रक्तदान करून शिबिराला प्रारंभ केला. दुपारी जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनीही शिबिराला भेट देत स्वतः रक्तदान केले. या शिबिरात 75 बाटल्या रक्त संकलित झाले. नागरिक व बहुतांश शासकीय कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या हस्ते रक्तदात्याना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

loading image
go to top