
Ravish Kumar in Pune : रविश कुमार पुण्यात; दगडूशेठ गणपतीचे घेतले दर्शन, Video Viral
पुणे : पत्रकार रविश कुमार पुण्यात आले असून त्यांनी पुण्यातील रस्त्यावरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. सकाळी सकाळी पुण्यातील लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता मार्गे आप्पा बळवंत चौक ते छत्रपती शिवाजी महाराज रस्ता असा प्रवास त्यांनी केला असून पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीचे दर्शन त्यांनी घेतले.
हेही वाचा - सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...
त्यांच्या प्रवासाचा व्हिडिओ त्यांनी स्वत: शूट करून फेसबुकवर शेअर केला आहे. तर त्यांचा हा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांत व्हायरल होत आहे. कोणत्याही शहराला सकाळी सकाळी पाहायला छान वाटतं असं कॅप्शन टाकून त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
दरम्यान, रविश कुमार हे एनडीटीव्ही मध्ये कार्यरत होते, काही दिवसांपूर्वी उद्योजक अदानी यांनी या माध्यम समूहामध्ये गुंतवणूक केल्यामुळे रविश कुमार यांनी हा माध्यम समूह सोडला होता. त्यांना दोनदा रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम अवॉर्ड ऑफ द इयरचा सर्वोत्कृष्ट पत्रकार म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. त्याचबरोबर 2019 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे ते पाचवे भारतीय पत्रकार ठरले आहेत.