पुणे : पत्रकार वरुणराज भिडे पुरस्कार चावके, सांगवे, करमरकर आणि मेहता यांना जाहीर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

पुणे : पत्रकार वरुणराज भिडे पुरस्कार सुनिल चावके, सुशांत सांगवे, विनायक करमकर आणि अद्वैत मेहता यांना जाहीर. पत्रकार वरुणराज भिडे मित्र मंडळाने पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती.

 

पुणे : पत्रकार वरुणराज भिडे पुरस्कार सुनिल चावके, सुशांत सांगवे, विनायक करमकर आणि अद्वैत मेहता यांना जाहीर. पत्रकार वरुणराज भिडे मित्र मंडळाने पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती.

मराठी पत्रकारितेत महत्वपूर्ण योगदान दिलेल्या पत्रकारास 'मुख्य पुरस्कार' आणि पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पत्रकारांना 'आश्वासक पत्रकारिता पुरस्कार' देण्यात येतो. यावर्षीचा 'मुख्य पुरस्कार' ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके यांना जाहीर झाला आहे. तर, 'आश्वासक पत्रकारिता पुरस्कार' (शहर) विनायक करमरकर,  'आश्वासक पत्रकारिता पुरस्कार' (ग्रामीण) सुशांत सांगवे आणि  'आश्वासक पत्रकारिता पुरस्कार' (वृत्तवाहिनी) अद्वैत मेहता यांना जाहीर झाला आहे. 

पुरस्कार वितरण समारंभ २८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात होणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष उल्हास पवार, प्रकाश भोंडे, सतिश देसाई, अंकुश काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमास वात्रटटिकाकार रामदास फुटाणे आणि मालपाणी समुहाचे प्रमुख संजय मालपाणी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Journalist Varunaraj Bhide award to Chavke, Sangve, Karmarkar and Mehta