
मंचर : “सभागृहाबाहेर पाऊस पडला, गारा पडल्या, ऊन पडले असे तिघांनी वेगवेगळे सांगितल्यानंतर तिघांच्या बाजू देणे हे पत्रकाराचे काम नाही. दरवाजा उघडून बाहेर जाऊन वास्तव्य दाखवणे ही खरी पत्रकारिता आहे. आपण दलाल किंवा मध्यस्थी नाही. जे दिसतं ते दाखवून देण्याचे काम करावे. त्यासाठी तळापर्यंत जाऊन शोध घेणे गरजेचे आहे.” असे मत ‘सकाळ’ चे संपादक सम्राट फडणीस यांनी व्यक्त केले.