घोडेगाव - अनेक अडथळ्यांचा मोठ्या हिमतीने व जिद्दीने सामना करत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील सिद्धेश्वर पातकर याने एमपीएससी परीक्षेत यश मिळवून अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या महसूल सहायकपदी त्याची निवड झाली आहे.
सिद्धेश्वर पातकर याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घोडेगाव येथे झाले. शहरात उच्चशिक्षण घेतले. त्याचे वडील सुनील अशोक पातकर यांनी माथाडी हमाल, तसेच आई सुरेखा पातकर या मोलमजुरी करून अत्यंत कष्टाने त्याला जितके जमेल तेवढे शिक्षणासाठी आपल्या परीने प्रयत्न केला. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सिद्धेश्वर याने निश्चय केला.
अनेक आर्थिक संकटांची पर्वा न करता आईवडिलांना सुखाचे दिवस दाखविण्यासाठी अहोरात्र अभ्यास करून यश संपादन केले. या यशाला गवसणी घालत घोडेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
सिद्धेश्वर याचे पहिली ते चौथीचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव येथे झाले. त्यानंतर ५ ते १२ वीपर्यंतचे शिक्षण जनता विद्या मंदिर घोडेगाव येथे झाले असून, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लोणावळा या ठिकाणी त्याने मेकॅनिकल इंजिनिअर केले.
जुलै २०२१ पासून एमपीएससी स्पर्धा परीक्षेसाठी सिद्धेश्वर याने तयारी सुरू केली होती. अखेर तो एमपीएससी परीक्षा पास होऊन अधिकारी झाला. माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.