पुर्व भागात ज्वारी काढणीलाआला वेग

पुर्व भागात ज्वारी काढणीलाआला  वेग
Published on

करमाळा तालुक्यात ज्वारी काढणीला वेग
मजुरी वाढल्याने शेतकरी सावड करत काढणी

पांडे, ता. ८ : करमाळा तालुक्याच्या पूर्व भागात ज्वारी काढणीला वेग आला आहे. मजुरीत वाढ झाल्यामुळे शेतकरी सावड करून ज्वारी काढणीस सुरुवात करत आहेत.
यंदा अतिवृष्टीमुळे आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे ज्वारीची पेरणी उशिरा झाली होती. ज्वारीचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्याच्या पूर्व भागात यंदा ज्वारी पिकाखालील क्षेत्रात घट झाली असून, गहू, हरभरा, मका आणि ऊस या पिकांमध्ये वाढ झाली आहे.
वर्षभर खाण्यासाठी लागणारी ज्वारी तसेच जनावरांसाठी लागणारा कडबा यासाठी ज्वारी महत्त्वाचे पीक असल्याने शेतकऱ्यांकडे ज्वारीची पेरणी करण्याशिवाय पर्याय नव्हता. अनेक शेतकऱ्यांनी उशिरा ज्वारीची पेरणी केली होती. आता पीक काढणीला आल्याने ज्वारी काढणीला वेग आला आहे.

कोट
- मजुरी वाढल्याने शेतकरी नाईलाजाने सावड करून ज्वारी काढणी करत आहेत. जनावरांच्या चाऱ्यासाठी कडबा लागत असल्याने ज्वारीची पेरणी करावी लागते. मात्र मजून मिळत नसल्याने अडचणी येत आहेत.
- विकास भोसले, शेतकरी

कोट
- ज्वारी काढणीसाठी एका जोडी मजुरांकडून सुमारे १४०० रुपये मजुरी घेतली जात आहे. वाढत्या मजुरीमुळे ज्वारीचे पीक परवडत नसल्याने सावड करून काढणी करणे हाच एकमेव पर्याय राहिला आहे.
- जयराम सोरटे, शेतकरी, पांडे

पांडे (ता. करमाळा) ः येथे ज्वारी काढताना शेतकरी.
PDE26B04990, PDE26B04991, PDE26B04992

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com