फलटणच्या घाऊक बाजारात ज्वारीला १० हजारांवर दर मका, बाजरी आणि गव्हाची आवक सर्वाधिक; बाजार समितीकडून १८ ऑक्टोबरचे दर जाहीर

फलटणच्या घाऊक बाजारात ज्वारीला १० हजारांवर दर  मका, बाजरी आणि गव्हाची आवक सर्वाधिक; बाजार समितीकडून १८ ऑक्टोबरचे दर जाहीर
Published on: 

फलटणमध्ये ज्वारीला १० हजार भाव

दुधेबावी, ता. १८ : फलटण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात रविवारी (ता. १८) विविध शेतमालांचे घाऊक बाजारभाव जाहीर करण्यात आले. यामध्ये ज्वारीला कमाल १० हजार १०० रुपये, हिरव्या मुगाला १० हजार ५०० रुपये, तर उडदाला १० हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
बाजार समितीच्या माहितीनुसार, ज्वारीचे दर प्रतिक्विंटल चार हजार ते १० हजार १०० रुपये, बाजरीचे तीन हजार ते चार हजार ७५१ रुपये, तर गव्हाचे दोन हजार ७०० ते चार हजार २७५ रुपये राहिले. हरभऱ्याला सात हजार ते आठ हजार रुपये, मक्याला दोन हजार ७०० ते तीन हजार २०० रुपये, तर खपलीला पाच हजार २०० ते सहा हजार ७०० रुपये दर मिळाला. कडधान्यांच्या बाजारात उडदाचे दर नऊ हजार ५०० ते १० हजार रुपये, हिरव्या मुगाचे नऊ हजार ५०० ते १० हजार ५०० रुपये, तर घेवड्याचे दर सात हजार ५०० ते १० हजार रुपये प्रतिक्विंटल होते. पिवळ्या मुगाला प्रतिक्विंटल १७ हजार रुपये दर मिळाला, अशी माहिती सचिव शंकरराव सोनवलकर यांनी दिली आहे.

------------------------
चौकट
मक्याची सर्वाधिक आवक
रविवारच्या बाजारात मक्याची ३१२ क्विंटल, गव्हाची २७४ क्विंटल आणि बाजरीची २६० क्विंटल आवक झाली. ज्वारीची ५० क्विंटल, हरभऱ्याची ५७ क्विंटल, उडदाची ३५ क्विंटल, घेवड्याची ४२ क्विंटल आणि हिरव्या मुगाची १३ क्विंटल आवक नोंदविण्यात आली. खपलीची आवक आठ क्विंटल होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com