esakal | पुणे जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाजाच्या वेळा बदलल्या
sakal

बोलून बातमी शोधा

Court

पुणे जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाजाच्या वेळा बदलल्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाजाच्या वेळा आणखी कमी केल्या आहेत. सध्या दोन शिफ्टमध्ये चार तास सुरू असलेले कामकाज एकाच शिफ्टमध्ये अडीच तासच चालणार आहे. सोमवारपासून (ता. १९) येथील जिल्हा न्यायालयातील कामकाज सकाळी ११ ते दुपारी दीड अशा एका शिफ्टमध्ये अडीच तास सुरू राहणार आहे. तसेच या काळात ५० टक्केच कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. मात्र, सर्व न्यायाधीशांनी उपस्थित राहावे, असे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या नियमावलीत नमूद करण्यात आले आहे. सध्या न्यायालयातील कामकाज सकाळी ११ ते दुपारी १ आणि दुपारी १.३० ते ३.३० अशा दोन शिफ्टमध्ये सुरू होते. त्यात जोडून आलेल्या सुट्या व उच्च न्यायालयाने दिलेल्या अतिरिक्त सुट्यांमुळे सोमवार ते शनिवारपर्यंत (ता. १२ ते १८) कामकाज बंद आहे.

अंतिम दाव्यांतच निकाल

ज्या दावे किंवा खटल्यांमध्ये युक्तिवाद पूर्ण झाला आहे, त्या प्रकरणांचे निकाल वा आदेश पारीत केले जाणार आहेत. रिमांड व तत्काळ स्वरूपाचे कामकाज सोडून, इतर सर्व कामांसाठी न्यायालये प्रत्येक शनिवारी बंद राहतील. न्यायालयीन कामकाज नेमके कसे चालणार याबाबत येथील मुख्य जिल्हा न्यायाधीशांचे आदेश येतील.