'जम्बो' घोषणतच; 200 व्हेंटीलेटरच्या खांटाची घोषणा अन् प्रत्यक्षात मात्र...

Jumbo-Covid-Center-pune
Jumbo-Covid-Center-pune

पुणे - पुण्यात दिमाखात उद्‌घाटन केलेल्या जम्बो कोविड सेंटरमध्ये २०० व्हेंटिलेटर उपलब्ध असतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. मात्र, प्रत्यक्षात पुणेकरांसाठी या सेंटरमध्ये साठच व्हेंटिलेटर राहणार असल्याचे कंत्राटदार एजन्सीला दिलेल्या ‘वर्क ऑर्डर’वरून उघड झाले आहे.

कोरोना रुग्णांना नेमके उपचार देण्याच्या उद्देशाने ‘सीओईपी’त उभारलेल्या जम्बो सेंटरचे उद्‌घाटन २३ ऑगस्टला अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी या ठिकाणी सहाशे ऑक्‍सिजन बेड व दोनशे व्हेंटिलेटरची सोय असेल, असे पवार यांनीच जाहीर केले होते. 

प्रत्यक्षात मात्र या सेंटर चालवणाऱ्या लाइफलाइन या एजन्सीला मिळालेल्या वर्क ऑर्डरमध्ये ६० व्हेंटिलेटर आणि १४० हाय ‘हाय डिपेंडन्सी युनिट’ असल्याचे म्हटले आहे. म्हणजेच, या १४० बेडवरील रुग्णांना व्हेटिंलेटर नव्हे तर ऑक्‍सिजनचाच पुरवठा होणार आहे.   कोरोनाचे रुग्ण वाढत असताना त्यांना नेमक्‍या आणि योग्य उपचाराची आशा दाखवून पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांसह ‘पीएआरएडीए’ आणि जिल्हा प्रशासनाने  जम्बोची सुविधा उभारली आहे. जम्बोची कल्पना मांडण्यापासून तिच्या उदघाटनापर्यंत अजित पवार हे दोनशे ‘आयसीयू’ अर्थात, व्हेंटिलेटर असतील असेच सांगत राहिले. त्यामुळे ‘व्हेंटिलेटर’ मिळेल, या आशेने अत्यवस्थ रुग्ण ‘जम्बो’त जात आहेत. परंतु, इतक्‍या बेडची सुविधा नसल्याने रुग्णांना दाखल करून घेतले जात नसल्याचे दिसत आहे.  रुग्ण दाखल होऊच नयेत, याची व्यवस्था करीत जाचक नियमही लागू केले आहेत. त्यामुळे जे काही रुग्ण दाखल झाले; त्यांची गैरसोय होत असल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काय आहे वर्क ऑर्डर 
जम्बोतील १४० ‘हाय डिपेंडन्सी युनिट’च्या माध्यमातून ऑक्‍सिजन पुरविले जात आहेत. तरीही, एका बेडला दिवसाचे ३ हजार ८४३ रुपये देण्यात येतील, असे ‘वर्क ऑर्डर’मध्ये नमूद केले आहे. ऑक्‍सिजन बेडसाठीचा हा खर्च १ हजार ४०४ रुपये आहे तर व्हेटिलेंटर बेडसाठी एका दिवसाचा खर्च ४ हजार ३८६ रुपये देण्यात येणार आहे, असेही ‘वर्क ऑर्डर’मध्ये स्पष्ट केलेले आहे.

मनुष्यबळ तोकडे
जम्बोतील आठशे बेडच्या उपचार व्यवस्थेसाठी ‘लाइफलाइन’ एजन्सीकडे तोकडे मनुष्यबळ असल्याचे आकडे ‘लाइफलाइन’ एजन्सीच्या खुलाशातून पुढे आले आहेत. एवढ्या बेडसाठी एकूण ७० डॉक्‍टर असून, त्यात एका शिफ्टसाठी जेमतेम २३ डॉक्‍टर असल्याचे दिसून आले आहे. तर दोनशे ‘आयसीयू’ बेडसाठी तिन्ही शिफ्टसाठी जेमतेम दहाच तज्ज्ञ डॉक्‍टर आहेत; त्यांच्या दिमतीला ७० कनिष्ठ डॉक्‍टर नेमले आहेत. गंभीर बाब म्हणजे, जम्बो व्यवस्थापनाकडे आजघडीला केवळ ७० परिचारिका; तर दीडशे वॉर्ड बॉय तर नऊ बाऊंसर असल्याचे ‘लाइफलाइन’ ने ‘सकाळ’ला सांगितले.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लाइफलाइनला नोटीस द्या : विक्रम कुमार
पुणे - निविदेप्रमाणे तज्ज्ञ, डॉक्‍टर, नर्स नाहीत, ‘पॉझिटिव्ह’ रुग्णाला दाखल करून घेतले जात नाही, रुग्णांना वेळेत जेवण मिळत नाही,  अशा तक्रारी करीत लाइफलाइनला कारणे दाखवा नोटीस द्या असे पत्र पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी ‘पीएमआरडीए’चे सीईओ सुहास दिवसे यांना पाठविले आहे.

आम्ही वर्क ऑर्डरप्रमाणे काम करीत आहोत. त्यात ६० व्हेंटिलेटर आणि १४० ‘हाय डिपेंडन्सी युनिट’ (एचडीयू) बेड आहेत. ‘एचडीयू’च्या माध्यमातून रुग्णांना ऑक्‍सिजन उपलब्ध होणार आहे. गरजेनुसार मनुष्यबळ वाढविण्यात येईल. तूर्तास त्याची गरज नाही.
- सुजित पाटकर, संचालक, लाइफलाइन,  हाॅस्पिटल सर्व्हिसेस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com