esakal | Video : ‘जंबो’नं दिलं नवं आयुष्य; रुग्णांनी व्यक्त केली कृतज्ञता
sakal

बोलून बातमी शोधा

Video : ‘जंबो’नं दिलं नवं आयुष्य; रुग्णांनी व्यक्त केली कृतज्ञता

आज मी तुमच्याशी बोलतेय ते फक्त जंबो रुग्णालयातील डॉक्‍टरांमुळे... येथे वेळेत मिळालेल्या प्रभावी उपचारांमुळे... चौदा दिवसांनंतर मला आता बरं वाटतंय. हे नवीन आयुष्य मला दिलंय या रुग्णालयानं... वयाची सत्त्याहत्तरी गाठलेल्या आजी ‘सकाळ’शी मोकळेपणानं बोलत होत्या. खरंतर मुलीला भेटायला उंब्रजवरून दीडशे किलोमीटरचा प्रवास करून मार्चमध्ये पुण्यात आले; पण कोरोनाग्रस्त झाले. मुलगी, जावई, नात सगळे एकापोठापाठ एक आजारी पडले, असेही त्या सांगत होत्या.

Video : ‘जंबो’नं दिलं नवं आयुष्य; रुग्णांनी व्यक्त केली कृतज्ञता

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - आज मी तुमच्याशी बोलतेय ते फक्त जंबो रुग्णालयातील डॉक्‍टरांमुळे... येथे वेळेत मिळालेल्या प्रभावी उपचारांमुळे... चौदा दिवसांनंतर मला आता बरं वाटतंय. हे नवीन आयुष्य मला दिलंय या रुग्णालयानं... वयाची सत्त्याहत्तरी गाठलेल्या आजी ‘सकाळ’शी मोकळेपणानं बोलत होत्या. खरंतर मुलीला भेटायला उंब्रजवरून दीडशे किलोमीटरचा प्रवास करून मार्चमध्ये पुण्यात आले; पण कोरोनाग्रस्त झाले. मुलगी, जावई, नात सगळे एकापोठापाठ एक आजारी पडले, असेही त्या सांगत होत्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर उभारलेल्या जंबो कोविड सेंटरमध्ये जाऊन ‘सकाळ’ने तेथील रुग्णांशी पहिला संवाद साधला. रुग्णांना तेथे मिळणाऱ्या वैद्यकीय सेवांची, तेथील व्यवस्थेची आणि पायाभूत सुविधांबद्दल थेट रुग्णांशी, त्यांच्या नातेवाइकांशी बोलून प्रत्यक्षदर्शी माहिती घेतली. त्यातून ही बोलकी प्रतिक्रिया पुढे आली.

पुण्यातील 68 वर्षीय आजोबांना नडला डेटिंगचा मोह!

मार्चमध्ये आपल्या एकुलत्या एक मुलीला भेटायला पुण्यात आलेल्या आजी येथेच अडकून पडल्या. आधी लॉकडाउनमुळे घरी जाता आलं नाही. नंतर अनलॉक होऊनही बस सुरू झाल्या नाहीत.

आता बस सुरू झाल्या, तर त्यांना कोरोनाची लागण झाली. घरातील सगळेच पॉझिटिव्ह आले. त्यांना उपचारासाठी जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करावं लागलं. त्यांना दम लागतं होता. धाप लागली होती; पण त्यातून आता त्या बऱ्या होत आहेत. याचं सगळं श्रेय त्या येथील डॉक्‍टरांना देतात. 

पुणे जिल्ह्याला उद्या ऑरेंज अलर्ट; अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची धांदल

कोथरूडमधील उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या ५८ वर्षीय महिलेवरही येथे उपचार सुरू आहेत. ‘‘तुम्ही उपचारांसाठी का दाखल झाला,’’ या प्रश्नाचं अत्यंत बोलकं उत्तरं त्यांनी दिलं. त्या म्हणाल्या, ‘‘माझ्या डॉक्‍टरांनी येथे दाखल होण्याचा सल्ला दिला. माझा माझ्या डॉक्‍टरांवर पूर्ण विश्‍वास आहे. त्यामुळे त्यांचा सल्ला मी ऐकला. सुरुवातीचे दहा दिवस अतिदक्षता विभागात दाखल होते. आता चार दिवसांपासून जनरल वॉर्डमध्ये आहे.’’

हिंजवडी कचरा प्रकल्पासाठी "एमआयडीसी'तर्फे पाच एकर

अप्पर इंदिरानगर येथील एका महिलेच्या सासूबाई जम्बो सेंटरमध्ये दाखल आहेत. त्या म्हणाल्या, ‘‘रुग्णाची प्रकृती कशी आहे? सध्या त्यांच्यावर काय उपचार सुरू आहेत? याची सगळी माहिती वेळोवेळी दिली जाते. पुढे काय उपचार करणार, त्याचा परिणाम काय होऊ शकतो, हे सांगितले जाते. तसेच रुग्णाशी टॅबवरून बोलताही येते.’’

आठशे बेड कार्यान्वित करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ, त्याला लागणाऱ्या वैद्यकीय साहित्याने रुग्णालय सुसज्ज करण्यात आले आहे. सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही संभाव्य दुसऱ्या लाटेत प्रत्येक रुग्णाला प्रभावी वैद्यकीय सेवा देण्यासाठी रुग्णालय सज्ज आहे.’’
- श्रेयांस कपाले, वैद्यकीय प्रमुख, जम्बो कोविड सेंटर

आठशे बेड कार्यान्वित करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ, त्याला लागणाऱ्या वैद्यकीय साहित्याने रुग्णालय सुसज्ज करण्यात आले आहे. संभाव्य दुसऱ्या लाटेत प्रत्येक रुग्णाला प्रभावी वैद्यकीय सेवा देण्यासाठी रुग्णालय सज्ज आहे.
- श्रेयांस कपाले, वैद्यकीय प्रमुख, जंबो कोविड सेंटर

Edited By - Prashant Patil

loading image
go to top