पुणे : जम्बो रुग्णालय पुन्हा कार्यान्वित करणार | Jumbo Hospital | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jumbo Hospital

पुणे : जम्बो रुग्णालय पुन्हा कार्यान्वित करणार

पुणे : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्यास सुरवात झाल्याने शिवाजीनगर येथील जम्बो रुग्णालय पुन्हा सुरू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार लवकरच रुग्णालयात कोरोना रुग्णांना दाखल करून घेतले जाईल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

जम्बो रग्णालयात विविध प्रकारचे एकूण ८०० बेड आहेत. त्यातील जनरल वॉर्डमधील २०० बेडवरील आरोग्य सुविधा सुरवातीला कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यानंतर गरज पडल्यास इतर प्रकारचे बेड देखील उपलब्ध केले जाणार आहे. जम्बोमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरातील खासगी डॉक्टरांची नियुक्त करण्याचा विचार सुरू आहे. वाढती रुग्णसंख्या विचारात घेता त्यांना आवश्‍यक असलेला ऑक्सीजनचा पुरवठा करण्यासाठी आवश्‍यक नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा: करार काय करता? ती जागाच मेडिकलची; नागपूरात एकत्रिकरणाचा घाट

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर जम्बोमधील उपचार थांबविण्यात आले होते. तर महापालिकेच्या बाणेर येथील रुग्णालयात सध्या कोरोना बाधीतांवर उपचार सुरू होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जम्बो पूर्ण क्षमेतेने सुरू होते. राज्यभरातून येथे रुग्ण दाखल झाले होते. त्यामुळे आरोग्य सेवेसाठी हे रुग्णालय मोठा आधार ठरले होते. पुन्हा दुसऱ्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यास सज्ज राहण्याची तयारी या माध्यमातून पालिका प्रशासन करीत आहे.

नागरिकांना माहिती मिळण्यासाठी कॉल सेंटर :

जम्बोमधील बेडची माहिती नागरिकांना मिळण्यासाठी कॉल सेंटर देखील सुरू करण्यात येणार आहे. बेड व इतर मदतीची माहिती या कॉल सेंटरद्वारे दिली जाणार आहे.

हेही वाचा: सोलापूर : 31 एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा; 11 बडतर्फ

जम्बो वापर करण्यासाठी सुस्थितीत :

दुसरी लाट कमी झाल्यानंतर हे रुग्णालय पूर्णतः बंद होते. त्यामुळे या रुग्णालयाचा आणखी वापर करता येवू शकतो का याचे आॅडीट करण्यात आले होते. रुग्णालय सुस्थिती असल्याने आॅडीटमधून स्पष्ट झाले होते. त्यामुळे आता त्याचा पुन्हा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Jumbo Hospital Starts Municipal Corporation Decision

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top