पुणेकरांची फसवणूक केलेल्या 'लाइफ़लाइन'ला जोरात टोचले इंजेक्शन; डिपॉझिट जप्त

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

"जम्बो'ची जबाबदारी असतानाही "लाइफलाइन'ने रुग्ण, उपचार, औषधे, जेवण आणि कामाचा तपशील ठेवला नसल्याचे दिसून आले आहे. हा तपशील नव्याने मिळविताना महापालिका आणि नव्या एजन्सीच्या नाकीनऊ आले आहेत.

पुणे - रुग्णांवरील उपचारांतील दिरंगाईबद्दल काम काढून घेतलेल्या "जम्बो'च्या जुन्या एजन्सीला म्हणजेच "लाइफलाइन'ला सोमवारी आणखी एक दणका बसला. या एजन्सीने भरलेली 25 लाखांची अनामत रक्‍कम (डिपॉझिट) जप्त केली आहे. 

गरजू रुग्णांना मोफत उपचारासाठी शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) मैदानावर उभारलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरच्या व्यवस्थापनात बेजबाबदारपणा दाखविल्याने "लाइफलाइन'चे कंत्राट रद्द करण्यात आले. त्यानंतर लगेचच नव्या एजन्सींना कामाचा आदेश दिला. वैद्यकीय आणि तांत्रिक क्षमता नसतानाही 800 रुग्ण व्यवस्थेचे काम मिळविलेल्या "लाइफलाइन'ला "पीएमआरडीए'ने कारवाईचा इशारा दिला होता. त्यापूर्वी कारणे दाखवा नोटीसही बजावली. प्रत्यक्षात मात्र, या नोटिशीची मुदत संपूनही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रुग्णांचा तपशीलच नाही 
"जम्बो'ची जबाबदारी असतानाही "लाइफलाइन'ने रुग्ण, उपचार, औषधे, जेवण आणि कामाचा तपशील ठेवला नसल्याचे दिसून आले आहे. हा तपशील नव्याने मिळविताना महापालिका आणि नव्या एजन्सीच्या नाकीनऊ आले आहेत. त्यावरूनही "लाइफलाइन'च्या कामाबाबत नवे आक्षेप घेण्यात येत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रुग्णाची ऑनलाइन माहिती 
रुग्णाच्या नातेवाइकांसाठी "जम्बो'च्या नव्या व्यवस्थापन समितीने सोमवारी आणखी एक सुविधा उपलब्ध केली. रुग्णांच्या प्रकृतीची सविस्तर माहिती ऑनलाइन देण्यात येत आहे. त्यामुळे नातेवाइकांना घरात बसून रुग्णाची प्रकृती कशी आहे?, याची माहिती जाणून घेता येते. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते या सुविधेचे उद्‌घाटन झाले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

"जम्बो'चे काम घेण्यासाठी "लाइफलाइन'ने भरलेली अनामत रक्कम जप्त केली असून, त्यातून रुग्णांसाठी नवीन सुविधा उपलब्ध केल्या आहेत. दुसरीकडे, टप्प्याटप्प्याने आणखी काही बेड वाढविणार आहोत. त्यामुळे अधिक रुग्णांना उपचार मिळतील. 
- रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jumbo's old contractor's deposit seized